Monday, February 8, 2021

माहुलीचा नवरा व नवऱ्याची करवली सुळके चढाई मोहीम (१४-१७ मार्च १९८७)

डिसेंबर १९८३ मध्ये दिलीप झुंझारराव च्या चमूने अजिंक्य नवरा सुळका (५२० फूट), ज्याला सध्या भटोबा नावाने ओळखतात, यशस्वीरीत्या चढल्यानंतर येथे - टीम्स आल्या होत्या. पण त्या चढाया यशस्वी झाल्या नव्हत्या, आणि नंतरच्या अशाच एका चढाईमध्ये निष्णात प्रस्तरारोहक प्रख्यात गिर्यारोहक अनिलकुमार ह्याचे अपघाती निधन झाले होते. मिलिंदनेच काही वर्षांपूर्वी नवऱ्याची करवली प्रथम सर केली होती ही जमेची बाजू. आमच्या मनामध्ये जरा ह्या माहुली रांगेतील दिसणाऱ्या देखण्या कठीण सुळक्यांच्या चढाईबद्दल धास्तीच वाटत होती. पण जगन्नाथ (बाळा) राऊळ नी टीम गोळा केली सर्व जण असेल तेव्हढे साहित्य घेऊन निघाले. तेंव्हा ह्या पिनॅकल्स चा तळ गाठणे म्हणजे महा कर्मकठीण काम होते, तेही सर्व वजन घेऊन जाऊन पाण्याची वानवा असताना. आसनगाव स्थानकातूनच चालायला सुरुवात करावी लागत होती... हो, माहुली गावात वाहन जाऊ शकत नव्हतं.

आम्ही सगळेजण १४ मार्चला रात्रीच्या ११ वाजताच्या आसनगाव ट्रेननी मुंबईहून निघालो, मध्यरात्री माहुली गावाकडे चालायला सुरवात केली. शुक्ल चतुर्दशी असल्यामूळे छान चंद्रप्रकाश पडला होता. तिथून पुढे पाणी शोधून २० लिटरच्या कॅन्स मध्ये भरून घेऊन बेस ला जायचे होते. रस्ता शोधत शोधत बेसला पोहोचायला पहाटेचे .३०- वाजले. प्रचंड अश्या स्क्री वरून सामान पाण्यासकट बेस ला पोहोचलो. बेस ला पोहोचण्यासाठी रोप लावायला लागणारे हे एकमेव ठिकाण असावे. झोपण्याचा थोडावेळ प्रयत्न करण्यात आला पण झोप काही लागली नाही कोणालाच. थंडीही होतीच, मग शेकोटीपाशी चहा गप्पा चालू झाल्या.

१५ मार्चला सकाळी लवकर उठून, तयारी करायला सुरुवात केली. दोन टीम्स करण्यात आल्या. मी, प्रदीप केळकर विश्वास थत्ते हे नवरा चढाईसाठी आणि दत्ता कऱ्हाडे, मिलिंद पाठक विजय भालेराव हे नवऱ्याच्या करवली सुळक्यावर चढाई करणार होते. नवऱ्याच्या बेस वरून त्याच्या फेमस क्रॅक आणि उंचच उंच अश्या चिमणीमध्ये पोहोचण्यापूर्वी २००-२५० फुटाचा एक ट्रॅव्हर्स मारावा लागणार होता. तिघांनाही तो आपापल्या बळावरच मारावा लागणार होता. सकाळी -.३० च्या सुमारास आम्ही चढाईस सुरुवात केली तासा दीड तासातच आम्ही चिमणी मध्ये पोचलो. प्रदीप लीड करत होता पण मध्ये मध्ये येणाऱ्या बोल्डर्स नी चिमणी ब्लॉक होत असल्यामुळे आम्हा सर्वांनाही हा सर्व रूट क्लाइम्बच करावा लागत होता, बिले रोप आहे हेच तेव्हढं समाधान होतं. चिमणीच्या टॉप ला पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती वरचा रूट नीट समजत नव्हता कारण वरती तर ओव्हरहॅन्ग दिसत होता. माथा २०-२५ फूटही लांब नव्हतामग उजवीकडे ट्रव्हर्स मारल्यावर एक जुना रिंग बोल्ट दिसल्यावर जरा हायसे वाटले. प्रदीप मी माथ्यावर पोहोचेपर्यंत संध्याकाळचे .३० वाजले होते, त्यामुळे विश्वास ला वर घेण्यात वेळ नं दवडता आम्ही रोपचा यू टाकून खालच्या चिमणीच्या टोकाशी उतरण्यास सुरुवात केली. खूप उशीर झाल्यामुळे, आदल्या रात्री झोप नं झाल्यामुळे, सर्व जण थकले होते अश्या अवस्थेमध्ये अंधारात रॅपलिंग नं करण्याचा निर्णय आम्ही घेतला, तसे बेस टीम ला कळवले रात्री त्या चिमणीतल्या निमुळत्या चिंचोळ्या जागेतच मुक्काम करण्याच्या तयारीला लागलो. रात्रभर बसून झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, प्रचंड थंडी (दातावर दात वाजत होते अक्षरश:) साप, विंचवांच्या भीतीने (जे आम्ही वर चढताना आम्हाला दिसले होते) झोप लागणं शक्यच नव्हतं. त्यादिवशी होळीपौर्णिमा असल्यामुळे पुरणपोळ्या बेसला असुनसुध्दा खाता फक्त चंद्राकडे बघत रात्र कशी काढली हे आमचं आम्हालाच माहित. खालूनपुरणपोळ्या झकास, तुप पण मस्त रवाळ कणीदार आहे अश्या आरोळ्या उठतच होत्या अधून मधून.

१६ मार्चला फटफटल्यावर लगेचच खाली उतरायच्या तयारीला लागलो. दुसऱ्या टीमला ही समिट व्हायला काल उशीर झाल्यामुळे त्यांनी रात्री रोप काढता नुसतेच रॅपल करून बेस कॅंप गाठला होता. त्यात वरच्या एका ट्रिकी कठीण पॅचवर दत्ताचा फॉल झाल्याचे नंतर कळले. मिलिंदनी नंतर त्याच्या "तिरक्या" हाताचा वापर करून, तो  पॅच पार केला काल संध्याकाळी नवऱ्याच्या करवलीचा माथा गाठला होता. आम्ही  खालती बेस ला पोहोचल्यावर चहा, नाश्ता करून जरा पहूडणार तोच बाळा म्हणाला की तू आणि विश्वास करवली सुळक्यावर जायला लागा, सगळे रोप काढून या. प्रदीप मिलिंदला आराम करुदे ...!!! मग काय, अख्खा दिवस चढण्यात रोप पिटॉन्स काढून खाली परत येण्यात गेला. सगळा कॅम्प गुंडाळेपर्यंत रात्रीचे जेवण संपे पर्यंत रात्रीचे १० वाजले होते. त्यानंतर आम्ही सामानाची बांधा बांध करून, उतरायला सुरुवात केली. मजल दरमजल करत माहुली गाव गाठलं, नंतर आसनगाव स्थानकाकडे चालायला सुरुवात केली. रात्री च्या सुमारास आसनगावला पोहोचलो. प्लॅटफॉर्म वरच पथाऱ्या पसरल्या. पण नंतर कळले कि पहाटे .१५ ला  पहिली लोकल ट्रेन आहे मुंबईला जायला, त्यामुळे झोपताच जागे राहिलो.

१७ मार्चचा ला सकाळी वाजता ठाण्यात पोहोचलो. गेले रात्री झोप मिळालेलीच नव्हती. घरी आल्यावर आंघोळ करून सकाळी वाजता घरात जे काही उरलं सुरलं होतं ते खाऊन सकाळी १० वाजता मी जो झोपलो, तो दुसऱ्या दिवशी सकाळी ला उठलो. २३ तास मेल्यासारखा झोपलो होतो, घरच्यांनी डॉक्टर ला बोलवायची तयारी चालू केली होती. माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी लांबलचक झोप म्हणावी लागेल.

You Tube Video link for above story to be experienced visually: Visual Story (Click here)

- अभिजित दांडेकर


No comments:

Post a Comment